कोपरगाव शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचे आद्यप लसीकरण न झाल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे पशुसंवर्धन विभाग व नगरपालिका कानाडोळा करत असल्या बाबत निर्भीड कोपरगाव वृत्त वाहिनीने सर्वांचे लक्ष वेधत मोकाट जनावरांमध्ये वाढत असलेल्या लम्पि आजाराबाबत वाचा फोडली होती.
शहरातील मोकाट जनावरांचे लसीकरण, शहरात लम्पिग्रस्त मोकाट जनावरांची वाढती संख्या त्याची पुढील देखभाल याबाबत आमच्या प्रतिनिधीने आ. आशुतोष काळे यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला असता याबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरच नगरपालिका व पशु संवर्धन या दोन विभागाची एकत्र बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर व तालुक्यातील मोकाट जनावरे लसीकरना पासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून अशातच शहरातील अनेक ठिकाणी ल्पमी सदृश मोकाट जनावरे आढळून येत आहे त्यामुळे शहरातील ल्पमी आजाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील मावळा चौफुली परिसर, तहसिल कार्यालय परिसरात लम्पिग्रस्त जनावरे आढळून आली आहेत. मोकाट जनावरांचे लसीकरण न झाल्याने अनेक मोकाट जनावरे लम्पिग्रस्त झाली असून त्यातील अनेक जनावरे मरणाच्या दारात उभे आहे. मोकाट जनावरांचे लसीकरण व ते लम्पी ग्रस्त झाल्यास त्याच्यावरील पुढील उपचाराबाबत नगरपालिका व पशुसंवर्धन विभागाकडुन सपशेल कानाडोळा होत असल्याने शहरात ल्पमीचा धोका वाढला असून पशुपालकानीं चिंता व्यक्त केली आहे.
मोकाट जनावरांचे लसीकरण व लम्पिग्रस्त जनावरांची देखभाल कोणी करायची याबाबत नगरपालिका व पशुसंवर्धन एकामेकांकडे बोट दाखवत उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. यामुळे निष्पाप जनावरांचे बळी जाण्याची दाट शक्यता आहे. मोकाट जनावरांचे लसीकरण त्याची शहरात वाढती संख्य तसेच लम्पिग्रस्त जनावरांची देखभाल याबाबत आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आमच्या प्रतिनिधीने प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत सविस्तर माहिती घेऊन नगरपालिका प्रशासन व पशुसंवर्धन विभाग यांच्यासोबत तातडीने संयुक्त बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले आहे.
मात्र नगरपालिका व पशु संवर्धन विभागा कडून एकमेकांकडे बोट दाखवण्यामध्ये मात्र अनेक जनावरे लम्पिच्या साथीने बाधित होत असून त्यात जनावरांचा जीव देखील जात आहे . आता आमदार या दोन विभागांची बैठक कधी लावणार ? याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का ? यापुढे या मोकाट जनावरांची काळजी घेतली जाईल का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या मुक्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.