कोपरगांव: संजीवनी एमबीए च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने सिटी युनियन बॅन्केने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात बॅन्केने गरजेनुसार चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. अशा प्रकारे एमबीए विभागाची आपल्या १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्याकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती संजीवनी एमबीएने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे विविध आस्थापना, बॅन्क, उद्योग यांना अभिप्रेत असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. यामुळे संजीवनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीने चांगल्या वार्षिक पॅकेजवर निवड होते. सिटी युनियन बॅन्केने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश शैलेश जगताप, अमर प्रमोद परदेशी, अभिषेक दत्तात्रय पवार व शुभम राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, एमबीए विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर व डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डॉ. विशाल तिडके यांचे अभिनंदन केले आहे.
मी टाकळी ता. कोपरगांव येथिल सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा. घरची परीस्थिती तशी जेमतेमच, परंतु आई वडीलांनी जिध्दीने शिकविले. मला संजीवनी मधुन एमबीए केल्यावर नोकरी मिळेलच याची खात्री होती कारण संजीवनीची तशी परंपरा आहे. म्हणुन मी मार्केटींग अँड फायनान्स विषय घेवुन एमबीए पुर्ण केले. आमच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने मुलाखतीची भरपुर तयारी करून घेतली तसेच बॅन्किंग क्षेत्रातील सखोल माहिती दिली. या सर्व बाबींमुळे आमची सिटी युनियन बॅन्केत सहज नोकरीसाठी निवड झाली. संजीवनीमुळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.-अमर परदेशी (विद्यार्थी)