कोपरगाव :- कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देवून ज्येष्ठ व्यक्तीशी वडीलकीच्या नात्याने व तरुणाईशी नेहमी हसून खेळून वागणारे आ. आशुतोष काळे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झालेल्या कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे ते देखील कोणत्याही निवडणुका नसतांना हे विशेष.
रामपूरवाडीच्या या युवकांमध्ये किरण अभंग, अविनाश लोंढे, महेश चोरमल, उमेश इंगळे, अमन साबळे, प्रशांत गोरे, अविनाश लोंढे, विशाल अभंग, शुभम लोंढे, वैभव नळे, प्रशांत बनकर, शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. या युवकांमध्ये अनेक युवक उच्च शिक्षित असून काही युवक उच्च शिक्षण घेत आहेत. आ.आशुतोष काळे हे देखील उच्चशिक्षित असल्यामुळे तरुणाईशी आ.आशुतोष काळे यांची जवळीक आहे.
त्यामुळे निवडणुका नसतांना देखील तरुणाई त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात दाखल होत आहे याचा त्यांना भविष्यकाळात मोठा फायदा होणार आहे. या सर्व युवकांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला व त्यांचे विचार जाणून घेतले. यावेळी श्याम जगताप, मनोज गोरे, दिनेश जगताप, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.