बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मुंबईवरून आली रुग्णवाहिका !
कोपरगाव – मानव आणि पाळीव प्राणी यामध्ये जिवाभावाचे संबंध आहेत मात्र अनेक वाईट गोष्टी कुत्र्याबाबत आपणास ऐकण्यास मिळतात आणि मन सुन्न होते माणूस गरज असली का प्राण्यांचा आपला सोयी प्रमाणे वापर करून घेतो आणि गरज संपली का त्यांना वाऱ्यावर सोडून देतो.
असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडला असून गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील प्रसिद्ध अशा चर्च मागे असलेल्या काटवनात अज्ञात नागरिकांनी उघड्यावर सोडून दिलेल्या नवजात 10 ते 12 कुत्र्याच्या पिल्लांना अॅनीमल क्राईम कंट्रोल या संघटनेच्या नॅशनल आॅफीसर या पदावर असलेल्या सत्यशिला मोरे यांनी माणूसकीच्या भावनेतून आश्रय देत त्या पिल्लांना पुढिल संगोपनासाठी मुबंई येथील कुत्र्याचा संगोपन करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला व त्या पिल्लांना पुढील संगोपनासाठी रुग्णवाहिकेतून मुंबई येथे रवाना केले आहे.
यावेळी शहरातील नागरीकांना त्यांनी कुत्र्यांच्या पिलांना योग्य सांभाळ करून ती मोठी झाल्या नंतर त्यांना योग्य ठिकाणी पोहचविण्याचे आवाहन केले आहे.
एखाद्या भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांसाठीची त्या महिलेची माणुसकी आणि अॅनीमल क्राईम कंट्रोल या संघटनेनी मुबाईवरून त्याच्यासाठी पाठवलेली रुग्णवाहिका यावरून त्यांच्या प्राण्यांविषयी असलेल्या आत्मीयतेविषयी खूप काही सांगून जाते.