उद्योजक बनुन नोकऱ्या देणारे बनावे- सुमित कोल्हे
संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये उद्योजगक दिवस संपन्न
कोपरगांव: महाविद्यालयीन युवक-युवतींनी आपले शिक्षण पुर्ण केल्यावर इतरांकडे नोकरी मागण्यापेक्षा उद्योजक बनुन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. यासाठी संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातुन आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचाही फायदा घ्यावा, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस्, कोॅमर्स अँड सायन्स काॅलेजच्या वतीने महाविद्यालयात नुकताच जागतिक उद्योजक दिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी येथुन शिक्षण घेवुन यशस्वी उद्योजक म्हणुन विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या माजी विध्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्राच्या अध्यक्षस्थानावरून श्री कोल्हे बोलत होते.
सध्या शिकत असलेले महाविद्यालयीन विध्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कापसे पैठणीचे संचालक श्री दिलीप बाळासाहेब खोकले, प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर व सर्व विभाग प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांची ग्रामिण तरूणांनी उद्योजक होण्याची तिव्र इच्छा असायची. त्यासाठी ते सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन करायचे. आजही तोच वारसा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे पुढे नेत आहेत. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व पाॅलीटेक्निकचे माजी विध्यार्थी हे देश परदेशात यशस्वी उद्योजक म्हणुन कार्यरत आहेत, ही बाब संजीवनीच्या दृष्टीने भूषणावह आहे.
यावेळी बोलताना कापसे पैठणीचे संचालक श्री दिलीप कापसे म्हणाले की स्टार्ट अप आणि प्रत्येक व्यवसायाच्या उभारणीसाठी दृढ निश्चय , संयम आणि सातत्य या बाबी महत्वाच्या भुमिका बजावतात. याचवेळी एक संवादात्मक सत्र देखिल आयोजीत करण्यात आले. ज्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास , संघर्ष आणि अंतिम यशाचा प्रवास हा सध्याच्या विध्यार्थ्यांना सांगीतला आणि त्याद्वारे विध्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डाॅ. सरीता भुतडा, प्रा. मुक्ता शिंदे , प्रा. योगेश गाढवे, प्रा. वाय.पी. शिंदे , प्रा. विशाल निंबोळकर, इत्यादींचे विशेष सहकार्य लाभले. सुत्रसंचलन प्रा. रचना नगरकर यांनी केले तर प्रा. लिना मंटाला यांनी आभार मानले.