समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी
कोपरगाव – समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. बारावी विज्ञान शाखेचा २०२१-२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.१० वी ची उज्वल निकालाची परंपरा कायम राखत सीबीएसई बारावी विज्ञान शाखेच्या पहिल्या बॅचचा निकाल ही १०० टक्के लागला असून समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालात ही यशस्वी झाला असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.
समता इंटरनॅशनल स्कूलचे बारावी विज्ञान शाखेतील सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून हर्ष दुबे याने ८९.४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.प्रसाद जोशी याला ८९.२ टक्के तर योगेश्वरी गाडे हिला ८४ टक्के गुण मिळाले असून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
तर योगिता वाघ,धनश्री लूनावत, प्रशांत द्रुमिल,तन्वी दवंगे,नीरज भुजबळ, कृष्णराज पाटील,हर्ष ठाकूर,ऐश्वर्या पाखरे,शंतनु होन, प्रणव डांगे,श्रेया भुजाडे,चेतन निंबाळकर,साक्षी धनवटे,पूर्वेश गुजर,निखिल तुंबारे,प्रांजल गांधी, लिची मुथा,यश शिंदे,हृषिकेश भाले आदी विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या सौ.शिल्पा जेजुरकर , उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.