कोपरगाव – सदर प्रसिद्ध पत्रकात मंगेश पाटील म्हणाले आहे की, कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील ५ नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला काँक्रिटीकरणाचे भिंत उभारण्यात आल्या मात्र तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेले जात आहे. मात्र तळात काँक्रिटी का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये म्हंटले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे. याचा अर्थ तळ्यात लिकेजेस, पर्क्युलेशन आहे. जर पाणी आत येत असेल तर निश्चित ५ नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पण परकुलेट होऊ शकते. तळ्याच्या खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली, त्यावर वाळू/बारीक क्रश, आर्टिफिशल खडी टाकली व त्या खडीवर प्लास्टिकचा कागद टाकून वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिला आहे तर काही भागांमध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी/वाळू न टाकता पूर्ण मातीचाच लेअर दिलेला दिसतोय तसेच पाणी दुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येतं ते बंद करणं गरजेचं असताना तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले असल्याचा आरोप मंगेश पाटील यांनी केला आहे.
आधीच कोपरगावकर गढूळ व अस्वच्छ पाण्याने त्रस्त असून ५ , १५ तर कधी २५ दिवसातून एकदाच पाणी असा त्रास या जनतेने कोपरगावच्या शहरातील सर्वांनी भोगलेला आहे , भोगत आहे. सदर प्लास्टिक कागद कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे. अन्यथा हे तळे झाल्यानंतर जर लिकेज राहिले मोठ्या प्रमाणात तर जनतेला परत पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. तळाला हार्ड रॉक होता काही ठिकाणी कडक मुरुम ही होता. यासाठी काँक्रिटीकरणच खालच्या तळाला करणे गरजेचे होते असे न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले असा प्रश्न मंगेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सदर तलावात मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देईल आणि जर त्यात खेकडे असले तर ते खेकडे मातीतून तो प्लास्टिकचा कागद सहज कुरतोडतील व यामुळे पाणी पूर्वीप्रमाणे इतरत्र जायची भीती आहे. तरी नगरपालिकेने व जनतेने तिथं जाऊन अजून सुद्धा बघू शकता की पाणी कसं पर्कुलेट होत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असा निधी मिळत नसतो आधीच खूप वर्ष जनतेला पाण्या वाचून खूप हाल झालेली आहे असेही ते म्हणाले आहे.
पुढे ते म्हणाले आहे की, हे नवीन तळ्याचे काम होते माती व प्लास्टिकचा कागद न वापरता काँक्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनल मधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता , परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा. तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा नगरपालिकेने करावा अशी मागणी मंगेश पाटील यांनी शेवटी नगरपालिकेकडे केली आहे.