कोपरगाव – संविधान चौक टिळक नगर फाउंडेशन च्या वतीने भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भदंत कश्यप लुंम्बिनी विहार यांच्या हस्ते गौतम बुद्धांची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंगेश पाटील म्हणाले भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे देश चालत आहे. कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात टिळक नगर ,संजयनगर ,सुभाषनगर, गांधीनगर,105 , खडकी लक्ष्मीनगर , नदीकाठचा भाग , बैल बाजार रोड अशा बऱ्याच ठिकाणी गोरगरीब व हातावरची जनता लोक माता भगिनी राहात आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत गोरगरीब तळागाळातील लोक मुले शिकत नाही तोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांचे मनातील आपली मुले मोठे झाले पाहिजे , त्यांना चांगल्या घरात राहिला आले पाहिजे, त्यांना चांगली जीवन उपभोक्ता आले पाहिजे . जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे यासाठी शिकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून नेहमी वंचितांसाठी गोरगरिबांसाठी झटत असणारी या संविधान चौक फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन भाऊ शिंदे व त्यांचे सहकारी तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले शुगर केन ट्रान्सपोर्ट चे अध्यक्ष परांग संधान ,माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे , नगरसेविका सौ.वर्षाताई शिंगाडे , बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयजी त्रिभुवन या सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिकेची शाळा , कोपरगाव नगरपालिके मार्फत प्रयत्न करून ही जर सर्व सोयीन युक्त अद्यावत अशी जर केली , तर निश्चित पणे कोपरगाव शहरातील गोरगरीब माता-भगिनी यांची मुले येथे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील व मोठे होतील हेच आज तथागत बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आम्ही यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली इच्छा व्यक्त केली.
संविधान चौक फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व बुद्ध जयंती साजरी केली जाते. या फाउंडेशन तर्फे गोरगरीब मुलांना शाळेसाठी वह्या ,पुस्तक , पेन पाटी तसेच ड्रेसचेही वाटप करण्यात येते. ह्या फाउंडेशनने काही मुलेही जी अत्यंत गरीब आहे ,परंतु त्यांना शिकायची इच्छा आहे अशांना दत्तक घेऊन त्यांची शिक्षणाची सोय ते करत आहेत .
अशा या फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जी शिंदे व त्यांचे सहकारी ह्या सर्वांचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या स्तुत्य अश्या उपक्रमाचे व सदस्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बिपिन जी गायकवाड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बौद्धाचार्य नानासाहेब जगताप , ॲड. अजित जी झोडगे , साहेबरावजी कोपरे, मार्केट कमिटीचे सचिव नानासाहेब रणशुर, जितेंद्र जी साळवे , मेजर मारुती कोपरे , माजी नगरसेवक संजय जी कांबळे , शिवाजी चाबुकस्वार ,अशोक कोपरे ,सागर कोपरे ,सचिन शिंदे ,विशाल शिंदे पप्पू बागुल ,बाला पवार, जीवन वाघमारे ,गोरख इंगळे तसेच रेखाताई चाबूकस्वार ,लक्ष्मीबाई वाघमारे ,भारतीताई शिंदे त्यांच्यासह अनेक मान्यवर व महिला माता भगिनी , बाळ गोपाळ मुली मुली मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले व या फाउंडेशनच्या चांगल्या कामासाठी मागे उभे राहण्याची ग्वाही दिली. यानंतर सर्व उपस्थितानी त्या परिसरातील लोकांनी भोजनाचा लाभ घेतला व संविधान फाउंडेशनचे आभार मानले …