कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा चराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिने ०८ मे रोजी सकाळी ०८.५० पूर्वी कधीतरी आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र दोन्ही घटनांचे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पहिल्या घटनेत सोमवार दि. ०८ मे रोजी सकाळी ०८.५० पूर्वी कधीतरी कोपरगाव तालुक्यात आंचलगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिने ०८ मे रोजी सकाळी ०८.५० पूर्वी कधीतरी आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.
सदर घटना घरच्या नातेवाईकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल एस.डी.बोटे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील सोनार वस्ती येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बुधवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 च्या पूर्वी सोनार वस्ती नजीक असलेल्या चराच्या पाण्यात पडुन बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर चिमुकली कपडे धुण्यासाठी तेथे गेल्याची प्राथमिक माहिती मिळते.
सदर चिमुकली पाण्यात पडल्याची माहिती तिच्या सोबत गेलेल्या दोन मैत्रिणीनी तिच्या नातवाईक व स्थानिक नागरिकाना सांगताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तनीषाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र पाणी अधिक असल्याने तिला शोधन्यात मोठी अडचण येत होती. अखेर काही तासांच्या प्रयत्नानंतर तिला शोधण्यात स्थानिक नागरिकाना यश आले आहे.
सदर चिमुकलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले होते. सदरची माहिती तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला असून आपल्या दप्तरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहे.
वर्तमानात आत्महत्या हा वैयक्तिक विषय नसून सामाजिक विषय आहे. यासाठी सरकार, प्रशासन, समाज आणि कुटुंब असे एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र अशा घटना वारंवार होत असून हा चिंतेचा विषय बनला आहे .