संजीवनी आयुर्वेदा काॅलेजमध्ये प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे स्वागत
कोपरगांव: ‘आयुर्वेद’ ही चिकित्सा पध्दती प्राचिन काळापासुन देशात आस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरत आहेत. संजीवनी आयुर्वेदा काॅलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या शास्त्राचे ज्ञान घेतल्यानंतर आयुर्वेंद शास्त्रानुसार वेगवेगळ्या आजारांवर उपचार करून खऱ्या अर्थाने भारतीय आयुर्वेदाची प्राचिन संस्कृती जोपासली जाणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डाॅ. रामदास अव्हाड यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित चालुु शैक्षणिक वर्षापासून संजीवनी आयुर्वेदा काॅलेजची सुरूवात करण्यात आली आहे. या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात डाॅ. आव्हाड पमुख पाहुणे म्हणुन बोेलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीन कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले.
सदर प्रसंगी विश्वस्त सुमित कोल्हे, डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. रामेश्वर पवार, मुकूंद भोर व्यासपीठावर उपस्थित होते.
डाॅ. आव्हाड पुढे म्हणाले की आयुर्वेद हे मुख्यतः भारतीय विज्ञान आहे. आयुर्वेद हा संस्कृत शब्द असुन त्याचा अर्थ जीवनावे शास्त्र असा आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे मला नेहमी सांगणे असायचे की डाॅक्टर तुम्ही आयुर्वेद काॅलेज सुरू करा. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात काॅलेज संकल्पनेचे घर केले होते. परंतु ते त्यांचे शब्द संजीवनी शैक्षणिक संकुलानेच पुर्ण केले आहे, त्यामुळे हे काॅलेज माझ्या स्वप्नातील आयुर्वेदा काॅलेज असणार आहे. त्यामुळे मी या काॅलेजचे पालकत्व स्वीकारत असुन माझ्याकडून या काॅलेजच्या विध्यार्थ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करेल.
सदर प्रसंगी श्री सुमित कोल्हे म्हणाले की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची गोरगरीबांना परवडेल अशा खर्चात चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहीजे, अशी तळमळ असायची. त्यांच्या या विचारधारेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाच्या हास्पिटलच्या माध्यमातुन खेडोपाडी जावुन आरोग्य शिबिरे घेतली. भविष्यात येथिल विध्यार्थी शिक्षण पुर्ण करून जेव्हा ते आरोग्य सेवा समाजाला पुरवतील, तेव्हा त्यांच्या हातुन मोठी देश सेवा घडेल. आयुर्वेदामुळे जगात भारताची वेगळी ओळख आहे, आयुर्वेदाची चळवळ भविष्यात अधिक गतिमान होईल.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नितिन कोेल्हे म्हणाले की आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, स्वावलंबी बनावे, अशी प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. म्हणुन येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांनी पालकांच्या अपेक्षांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा वडीलकिचा सल्ला दिला.
दुपारच्या सत्रात डाॅ. पवार यांनी परीक्षा पध्दतीच्या पॅटर्न विषयी माहिती दिली. तसेच आयुर्वेद क्षेत्रात योगदान असणारे डाॅ. महेंद्र तोष्णीवाल , डाॅ. अपश्चिम बरांट, डाॅ. नारायण पाटील व डाॅ. संजय लुंगारे यांनीही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विभाग प्रमुख डाॅ. कौस्तुभ भोईर यांनी कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले.