कोपरगांव प्रतिनिधी – तालुक्यातील ब्राम्हणगांव शिवारातील एका शेतकर्याच्या कांदा चाळीतून चार क्विटंल सोयाबीन व 50 किलो गव्हाची अज्ञात चोरी केल्यानंतर कोपरगांव ग्रामिण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवताच बारा तासात या गुन्हयातील तिन आरोपींना जेरबंद केले असून 27 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश केला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.
या याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ब्राम्हणगांव शिवारातील शेतकरी रमेश भिकाजी आंबिलवादे वय 50 याचे का्ंद्याचे चाळीतून 20 हजार रुपये किंमतीचे चार क्विटंल सोयाबीन व बाराशे रुपये किंमतीचे 50 किलो गव्हाची गोणी 22 मार्च रोजी चोरीस गेली यासंदर्भात पोलीसांकडे गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरु लागली ,सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की संशयीत आरोपी हे ब्राम्हणगांव येथे फिरत आहे.
पोलीस निरिक्षक वासुदेव देसले स.फौ.ए एम आंधळे पो कॉ रशीद शेख पो कॉ के बी सानप व चालक पो ना साळुंके यांनी घटनास्थळी जावून संशयीत आरोपी संतोष भास्कर पवार वय 32 , शंकर नामदेव माळी वय 28 , राहुल आप्पा ठाकरे वय 25 सर्व रा. ब्राम्हणगांव हे मिळून आले.
या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली दिली या आरोपींना कोपरगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेपुढे उभे केले असतां सोमवार 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी हे सरार्इत गुन्हेगार असून त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.