कोपरगाव प्रतिनिधी : शहरातील अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाचे दुरुस्तीची निविदा निघून ठेका दिल्यानंतर सव्वा ते दीड वर्ष उलटून गेले तरीही दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही.याप्रकरणी प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठल्यानंतर याची गंभीर दखल नगरपरिषद प्रशासनाने घेतली आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावणार असून त्याच्यामध्ये सुधारणा न झाल्यास आम्ही ठेकेदार बदलणार असल्याचे नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी शांताराम गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील एकमेव असलेल्या अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाची दुरावस्था झाल्याने मोठ्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सदर खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी आला आहे त्याप्रमाणे नगरपालिकेने निविदा प्रसिद्ध करून सव्वा ते दीड वर्षांपूर्वी येथील एका स्थानिक ठेकेदारास काम दिले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते कामाच्या शुभारंभाचे नारळ ही फोडण्यात आले होते. परंतु आजतागायत खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाली नाही. याची चर्चा अनेकदा चहाट्यावर आली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी कडून वारंवार विचारणा होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
एक वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाच्या ठेकेदाराकडून काम काढून घ्या, अशी मागणी नगरपालिकेकडे केली होती, परंतु वर्ष होऊनही काम सुरू झाले नाही किंवा ठेकेदारावर ही कारवाई झाली नाही येत्या २६ जानेवारी पर्यंत काम सुरु न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनातून मंगळवारी (१७) रोजी दिला आहे.
मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी सांगितले की, ठेकेदार यांचेशी आपली चर्चा झाली असून त्यांनी आपल्याला सदरचे काम परवडत नसल्याचे सांगितले असुन, संबंधित ठेकेदाराला त्यामुळे नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याच्यांत सुधारणा न झाल्यास ठेकेदार बदलणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.एक वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०२२ रोजी अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाच्या ठेकेदाराकडून काम काढून घ्या, अशी मागणी नगरपालिकेकडे केली होती, परंतु वर्ष होऊनही काम सुरू झाले नाही किंवा ठेकेदारावर ही कारवाई झाली नाही येत्या २६ जानेवारी पर्यंत काम सुरु न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनातून मंगळवारी (१७) रोजी दिला आहे.