कोपरगाव – गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य मठाधिपती प.पु. रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी भक्ती निवास क्रमांक २ जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिली आहे.
सदर अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यात दि.१/११/२०२२ ते दि. ३/११/२०२२ ओम महामृत्युंजय यज्ञ सोहळा दि.३/११/२०२२ – यज्ञाची पुर्णहुती सोहळा तर दि.४/११/२०२२ रोजी सायंकाळी ०७:०० वाजता अभिष्टचिंतन सोहळा, पाद्यपुजन, साधुसंतांचे अमृतवाणीतुन प्रवचन व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान, काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट तसेच स्वामी जनार्धन फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मठाधिपती प.पु. रमेशगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात
आला आहे.
सदर अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मुख्य संचालक नितीनदादा कोल्हे, माजी नगराध्यक्ष मंगेशदादा पाटील, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे उपस्थित राहणार आहेत.
सदर अभिष्टचिंतन सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर, उपाध्यक्ष विलास यादवराव कोते पाटील,सचिव अंबादास दादा अंत्रे, त्र्यंबक कृष्णाजी पाटील, रामकृष्ण बंडूजी कोकाटे, अनिल बाप्पासाहेब जाधव, आशुतोष विलासराव पानगव्हाणे, संदिप मोहनराव चव्हाण, अतुल बाबुराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे आदींनी केले आहे.