कोपरगाव शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
अहमदनगर डिस्ट्रिक्ट योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये करिष्मा हलवाई हिचा प्रथम क्रमांक
कोपरगाव – नुकत्याच संगमनेर येथे मालपाणी ग्रुप व अहमदनगर ड्रीस्टिक योगासना स्पोर्ट्स असो सिएशन चे डॉ संजय मालपाणी आयोजित अहमदनगर डिस्ट्रिक्ट योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कोपरगाव येथील के जे सोमय्या कॉलेज ची सायन्स शाखेची विद्यार्थिनी व अभिनेत्री करिष्मा हलवाई यांनी आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला असुन त्यांची राज्यज्यस्तरिय योग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात याच्या हस्ते करण्यात आले , यावेळी सेक्रेटरी श्री उमेश झोटिंग, डॉ अरुण खोडसकर, भाईचंद पडळकर आदी उपस्थित होते, या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 114 स्पर्धक सहभागी झाले होते.
यातून कोपरगाव येथील के जे सोमय्या कॉलेज ची सायन्स शाखेची विद्यार्थिनी व अभिनेत्री करिष्मा हलवाई यांनी आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला असुन त्यांची राज्यज्यस्तरिय योग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
करिष्मा हलवाई यांना नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देखील मिळाला असून त्यांनी नृत्य सर्धेत देखील गोल्ड मेडल मिळवले आहे ,मॉडेलिंग क्षेत्रात देखील त्या अग्रेसर असून स्टारडम इंडिया या फॅशन शोच्या ब्रँड आंबेसेटर देखील आहे.
या निवडीबद्दल त्याच कॉलेज चे प्राचार्य तसेच सर्व शिक्षकानी अभिनंदन केलं असुन कोपरगाव चे आमदार व साईबाबां सस्थान चे अध्यक्ष आशुतोष दादा काळे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
योगविद्या चा अभ्यास प्रत्येकांनी करणं आवश्यक असुन भविष्यात ती आपली सस्कृती तसेच उत्तम व्यतिमत्व ,बलवान शरीर व उत्तम बुद्धिमत्ता यासाठी योगाभ्यास असणं आवश्यक आहे असं मत अभिनेत्री करिष्मा हलवाई यांनी व्यक्त केलं आहे.