राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू-पेढे वाटून केला साजरा
राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड म्हणजे नारीशक्तीचा व भारतीय संविधानाचा विजय – स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज (२५ जुलै) शपथ घेतली. त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज कोपरगाव येथे फटाके फोडून आणि लाडू पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद साजरा केला.
राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड म्हणजे नारीशक्तीचा व भारतीय संविधानाचा विजय आहे, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे याप्रसंगी म्हणाल्या, आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. शिक्षिका ते राष्ट्रपती हा द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास हा आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना आदिवासी समाजातील एक कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे ही देशातील समस्त महिला वर्गासाठी अभिमानास्पद बाब आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांनी कौतुक करायलाच हवे.
देशाचा सर्वांगीण विकास आणि समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार काम करत आहे.
सौ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास’ या मार्गदर्शक संकल्पानुसार कार्य करत मोदी सरकारने असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातून आदिवासी समुदायांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत आहेत.
स्वातंत्र्यानंतर आलेल्या एकाही सरकारने आदिवासी जमातींच्या विकासासाठी कुठलीच ठोस पावले उचलली नाहीत, हे कटू सत्य आहे. आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत आणि त्यांना योग्य राजकीय प्रतिनिधित्वदेखील मिळाले नाही. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी समाजाच्या परिवर्तनाची मोहीम पुढे नेत आहेत.
आदिवासी समाजाचा सामाजिक-आर्थिक विकास आणि सक्षमीकरण, त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व हा नेहमीच भाजपच्या तत्त्वप्रणालीचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने द्रौपदी मुर्मू यांची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाप्रति पंतप्रधान मोदी यांच्या दृढ वचनबद्धतेचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करू शकतो हेच यातून सिद्ध होते. ‘माणसामध्ये देव बघा, प्रत्येकाला न्याय द्या, या सर्वाना सोबत घेऊन काम करा’ असा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. त्यानुसार भाजप आणि मोदी सरकार काम करीत आहे, असेही स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाइंचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, विनोद राक्षे, अकबर लाला शेख आदींची समयोचित भाषणे झाली. जितेंद्र रणशूर म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी समाजातील महिलेला देशाचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपेक्षित आदिवासी समाजातील महिलेला हा सन्मान दिल्याबद्दल यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांचाच विचार पुढे नेत बिपीनदादा कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मागासवर्गीय समाजाचे रमेश दादा घोडेराव यांची निवड करून आदर्श पायंडा पाडला आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संजीवनी बँकेचे चेअरमन प्रदीप नवले, दीपक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, भाजप शहर उपाध्यक्ष विजय चव्हाणके, अविनाश पाठक, कानिफनाथ गुंजाळ, नारायणशेठ अग्रवाल, माणिकराव चव्हाण, श्रीहरी रोहमारे, सुशांत खैरे, दिनेश कांबळे, अनिल जाधव, खालिकभाई कुरेशी, गोपीनाथ गायकवाड, दादासाहेब नाईकवाडे, सतीश साबळे, रामचंद्र साळुंके, भाजपचे वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ. नानासाहेब होन, शांताराम बर्डे, गणेश मोरे, अशोक जगताप, गोरख नाईक, संदीप गुरळे, सतीष केकाण, रिपाइंचे देवराम पगारे, संदीप निरभवणे, गोपीनाथ सोनावणे, किरण सुपेकर, जगदीश मोरे, हाशमभाई पटेल, जयेश बडवे, सतीश रानोडे, वैभव गिरमे, अशोकराव लकारे, फकीर मोहम्मद पैलवान, रोहन दरपेल, प्रकाश दवंगे, अर्जुन माकोणे, सतीश सुपेकर, भैय्या नागरे, दत्ता कोळपकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, आदिवासी समाजातील नागरिक, कोपरगाव शहर, येसगाव, मुर्शतपुर, शिंगणापूर, संवत्सर, कुंभारी, जेऊर कुंभारी, धारणगाव, हिंगणी, जेऊर पाटोदा, सोनारी, चांदगव्हाण आदी गावातील आदिवासी महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.