“अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे” – अँड.नितीन पोळ
कोपरगाव – येत्या एक ऑगस्ट रोजी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०२ जयंती आहे संपूर्ण देशभर व परदेशात ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र काल मा जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश काढून आजपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत मात्र अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या जमावबंदी आदेशात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र यायचे नाही,वाद्य वाजवायचे नाही ,लाठ्या काठ्या,शस्त्र,दारू गोळा यांचा वापर करायचा नाही असे आदेश काढले आहे
येत्या एक तारखेला साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येते,मिरवणूक काढली जाते आद्य क्रांतिगुरु लहुजी दांड पट्टा शिकवायचे, अण्णा भाऊ साठे देखील काठी फिरवायचे त्यामुळे अनेक मिरवणुकीत दांड पट्टा व लाठ्या काठ्या असे खेळ खेळले जातात तसेच मिरवणूकी मध्ये वाद्य म्हणून डीजे,बँड आदी वाजवले जातात समाजातील अनेक बांधव ठिकठिकाणी जयंती करिता अभिवादन मंडप टाकतात प्रतिबंधात्मक आदेश काढल्याने अनेक ठिकाणी परवानग्या काढणे जिकरीचे होणार आहे.
त्यामुळे समाज बांधवांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी विविध संघटना वेगवेगळ्या वेळी मिरवणूक काढतात दोन तीन दिवस या मिरवणूक काढली जाते . त्यामुळे एक ऑगस्ट रोजी होणारी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश फोन तीन दिवस शिथिल करावे असे या पत्रकात म्हटले आहे.