गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लाववे – स्नेहलता कोल्हे
कोपरगांव – कोपरगांव आणि श्रीरामपुर या दोन तालुक्याच्या हद्दींना जोडणारा, शिर्डी शनिशिंगणापूर प्रति जेजुरी खंडोबा वाकडी यासह विविध देवस्थानांना ये जा करण्यासाठी, वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या गणेशनगर – वाकडी व्हाया औद्योगिक वसाहत श्रीरामपूर रस्त्याची पावसाने वाट लागली असून त्यास मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्यामुळे अबाल वृद्धासह शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून पायी चालणेही मुश्कील झाले असुन या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी वाकडी हनुमान मंदिर येथे लोकनियुक्त सरपंच डॉ. संपतराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वश्री. विठ्ठलराव शेळके, गणेश कारखान्याचे संचालक विधीज्ञ भाऊसाहेब शेळके, आण्णासाहेब कोते, संदिपानंद लहारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहारे, गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, वाकडी सोसायटीचे अध्यक्ष भिमराज सहारे, बी.डी. शेळके, अनिल कोते, महेश जाधव, अमोल तहारे, सुभाष कापरे, माजी सरपंच अनिल शेळके, नारायण शेळके, पंचायत समितीचे माजी सदस्य बापुराव लहारे, राजेंद्र तहारे, अमोल शेळके प्रफुल्ल शेळके, बाबासाहेब शेळके, विधीज्ञ बाळासाहेब कोते, ग्रामपंचायत सदस्य सुनिल कुरकुटे, माऊली दुध संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव शेळके, प्रविण धनवटे, भास्कर कोते, अशोक कोते, सुरेश लहारे आदी उपस्थित होते.
या शिष्टमंडळाने भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांची वाकडी येथे बुधवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर या रस्त्याची झालेली दुर्दशा सांगितली. संबंधित विभागाचे अधिकारी या रस्त्याचे दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करतात. त्यावर सौ. स्नेहलता कोल्हे यांनी संबंधीत विभागास दुरध्वनी करून या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे म्हणून विनवणी केली आहे. या रस्त्याचे काम लवकर मार्गी लागले नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ते उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत असेही शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.