कुंभारी प्रतिनिधी – कांद्याचे प्रश्न सरकारने गांभीर्याने विचार करावा व निर्यात खुली करावी कांद्याला सहा महिन्याचा कालावधी लागतो त्यामध्ये 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च हा शेतकरी करत असतो सध्या स्थितीत रासायनिक खतांचे वाढलेले दर व मजुरांची वाढलेले दर विजेची वाढलेले दर या सर्वांचा विचार करता कांद्याला सध्याच्या स्थितीत बाराशे चौदाशे रुपये भाव मिळत आहे एकीकडे शासन दुसऱ्या वस्तूंना हमीभाव देत असते तसेच कांद्यांना पण हमीभाव द्यावा अशी मागणी कुंभारी येथील सरपंच व प्रगतिशील शेतकरी दिगंबर गोपीनाथ बढे यांनी केली आहे.
ज्यावेळी शेतकरी कांदा पिकावत असतो त्यावेळी त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते सरकारने विक्री प्रोत्साहन पर अनुदान द्यावे निर्यात खुली करावी असे त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांकडे कांदा चाळीमध्ये साठवला जरी असला तरी 50% कांदा हा खराब होत असतो त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कांद्याला हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे शेवटी सांगितले.