“अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ
कोपरगाव – कोपरगाव शहरात नगर पालिकेने गेल्या आठ महिन्यांपूर्वी पूर्णाकृती पुतळा बसवला असून या पुतळ्या जवळ अभिवादन करायला जाणाऱ्यांना उभे राहायला पुरेशी जागा नाही त्यामुळे जयंती पूर्वी पुतळ्याच्या बाजूला संरक्षक कठडे बसवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात अँड.नितीन पोळ पुढे म्हणाले की गेल्या दहा बारा वर्षाच्या संघर्षानंतर आठ महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणला गेला अनेक वर्षे श्रेय वादाच्या राजकारणात शिल्पकार यांच्या गोडाऊन मध्ये धूळ खात पडलेला अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या प्रयत्नाने त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी कोपरगाव शहरात आणला मात्र कोपरगाव शहरात पुतळा आणून देखील अनावरण करण्यावरून अनेकदा राजकारण झाले माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटन सोहळ्याला विरोध झाला तर त्या पूर्वी समाजाच्या भगिनी स्वाती त्रिभुवन यांनी पुतळ्याचे अनावर काढले त्यानंतर देखील जल्लोषात अनावरण करायचे म्हणून पुतळा झाकून ठेवला मात्र १८ जुलै रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्यांची वाट न पाहता समाज बांधवांनी पुतळ्याचे आवरण काढून पुतळा खुला केला.
एक ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती आहे कोपरगाव, राहता, येवला,वैजापूर, सिन्नर या तीन चार तालुक्यात अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नाही त्यामुळे या भागातील अनेक अण्णा साठे प्रेमी अभिवादन करण्यासाठी कोपरगाव येथे येत असतात मात्र या पुतळ्याचे चौथऱ्या वर पुरेशी जागा नाही त्याच प्रमाणे बाजूला संरक्षक कठडे नाही चौथऱ्याची उंची लक्षत घेता त्या ठिकाणी उभे राहून अभिवादन करणे भीतीचे आहे त्याच प्रमाणे एकाच बाजूने जिना असल्यामुळे चौथऱ्यावर जाणारे व खाली उतरणारे यांची गर्दी होईल या बाबत वेळो वेळी नगर पालिका प्रशासनाला सूचना केली होती मात्र नगर पालिकेने याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे या ठिकाणी उभे राहून अभिवादन करणे अवघड होईल.
तसेच मागील दोन तीन महिन्यांपूर्वी नगर पालिकेने स्मारकाच्या मागील बाजूचे अतिक्रमण काढले कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसवली मात्र अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या मागे अद्याप तशी जाळी बसवली नाही त्यामुळे या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत आहे तसेच या स्मारकाच्या समोर पूर्वी नो पार्किंगचा बोर्ड लावलेला होता मात्र दुरुस्ती च्या वेळी तो बोर्ड काढून टाकला त्यामुळे या भागात अनेक व्यावसायिक आपले वाहने उभी करतात त्यामुळे जयंतीपूर्वी नगर पालिकेने त्वरित या गोष्टीची दखल घेऊन काम सुरू करावे असे या पत्रकात म्हटले आहे