कोपरगांव :- तालुक्यातील शिंगवे येथील काळे गटाला भगदाड पडले असुन शेकडो कार्यकत्यांनी सोमवारी भाजपा कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे होत्या.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव बाभुळके, उपसरपंच प्रशांत शिवाजी काळवाघे, गणिभाई शेख, जनार्दन ठोंबरे, राजेंद्र बाभुळके, राजेंद्र काळे, राजेंद्र काळवाघे, नितीन चौधरी, अरूण बाभूळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंगवे सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोकराव चौधरी सर, सोमनाथ पठारे, किरण पठारे, चंद्रभान लोखंडे, भाउसाहेब पठारे, दिपक पठारे, दत्तात्रय पठारे, आण्णासाहेब पठारे, सुर्यभान पठारे, बाबासाहेब लोखंडे, भारत पठारे, माणिक लोखंडे, गणेश शिद, अमोल शेळके, तुषार चौधरी, किरण पठारे, पोपट बरवंट, गणेश पठारे, आबा पठारे, मिननाथ पठारे, संतोष चौधरी, दत्तात्रय लोखंडे, दिलीप पठारे, नवनाथ पठारे, राहुल पठारे, योगेश नरोडे आदिंनी काळे गटाला सोडचिठठी देत कोल्हे गटात प्रवेश केला. युवानेते विवेकभैय्या यांनी युवकांच्या संघटनात आपले कौशल्य सर्वस्व पणाला लावल्यांने त्यांच्या कामावर प्रभावीत होवुन सर्वांनी कोल्हे गटात प्रवेश केल्याचे यावेळी सांगितले. श्री. विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, शिंगवे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा भाजपा कोल्हे गटावर असलेला विश्वास आणखी सार्थ करण्यासाठी प्रयत्न करू. सुत्रसंचलन चेतन काळवाघे तर आभार नितीन चौधरी यांनी मानले. यावेळी शिंगवे ग्रामस्थांनी युवा नेते विवेक कोल्हे यांची सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.