कोपरगाव – कोपरगाव शहरातील खडकी, गवारेनगर, शंकरनगर,ओम नगर, समता नगर, द्वारकानगरी येथे नियमित होणारा पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे खंडित झाला होता त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गौरसोय निर्माण झाली होती.
पाणी वेळेवर का आले नाही ? कधी येणार याबाबत नागरपालिकेकडून कुठलेही सूचना देण्यात आली नव्हती त्यामुळे नागरिकांना मोठा मंस्थाप सहन करावा लागला.
आज नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, कोपरगाव शहरातील खडकी, गवारेनगर, शंकरनगर,ओम नगर, समता नगर, द्वारकानगरी येथे आपला भागात नियमित होणारा पाणीपुरवठा काही तांत्रिक कारणाने खंडित झाला होता मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम नगरपरिषदे मार्फत पूर्ण झाले आहे.
तरी आपल्या भागातील होणारा पाणीपुरवठा मधील बदल करण्यात आले आहे ते खालील प्रमाणे.
7 जुलै समता नगर :- 2.15 वा. , गवारेनगर भाग दुपारी 1ते 3 , गवारेनगर भाग 2 ते 8:30 , ओम नगर भाग 1 ते 4 . , ओम नगर भाग 2 ते 5:45 , द्वारकानगरी :- 7:40 वा. , शंकरनगर रात्री 8:15 तर उद्या 8 जुलै रोजी सकाळी 5 वाजता खडकी परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी व पाणीपुरवठा विभाग, कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.