सरकारची नियमित शिष्यवृत्ती सुध्दा मिळणार
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या प्रथम वर्षाच्या १५ होतकरू व गरीब विध्यार्थ्यांना पुण्याच्या सायबेग साॅफ्टवेअर कंपनीने रू ९. ५० लाखांची शिष्यवृत्ती जाहिर केली असुन ही शिष्यवृत्ती पुढील तीन वर्षांसाठीही मिळणार आहे. अशा प्रकारे चार वर्षात या विध्यार्थ्यांना एकुण रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती मिळणार असुन त्यांच्या जाती संवर्गानुसार महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून मिळणारी शिष्यवृत्तीही त्यांना मिळणार आहे. संजीवनीच्या प्रयत्नाने अहमदनगर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विध्यार्थ्यांच्या पालकांना मोठा आर्थिक हातभार लागला आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की मोठ्या कंपन्यांना मिळणाऱ्या नफ्यातुन काही रक्कम समाजाच्या प्रगतीसाठी खर्च करायची असते. याला कार्पोरेट सोशल रिसपाॅन्सिबिलीटी (सीएसआर-व्यवसायिक जामाजिक जबाबदारी) निधी म्हणतात. यातुन सायबेग कंपनीने ‘सायबेग खुशबु स्काॅलरशिप’ नावाने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. यासाठी प्रथम ८० पात्र विध्यार्थ्यानी अर्ज दाखल केले होते. त्यातुन विभाग प्रमुखांच्या शिफारसीनुसार ४० अर्ज पुढे आले. त्यातुनही निवड समितीने २२ अर्ज पात्र ठरविले. कंपनीच्या प्रतिनिधींनी या २२ विध्यार्थ्यांच्या घरी जावुन त्यांच्या पालकांच्या आर्थिक प्राप्तीची शहानिशा करून त्यातुन १५ विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले. या विध्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी रू ५०,०००/- ते रू ७५,०००/-अशा रकमेची एकुण प्रतिवर्षी रू ९. ५० लाख, म्हणजे एकुण चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी एकुण रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच या १५ विध्यार्थ्यांना कंपनी मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असुन शिष्यवृत्ती तर मिळणारच, मात्र पात्र उमेदवारांना त्यांचे शिक्षण पुर्ण झाल्यावर या कंपनीत नोकरीही मिळणार आहे.
संजीवनीच्या प्रयत्नाने अनेक सर्व सामान्य कुटूंबातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये आकर्षक पगारावर नोकऱ्या मिळवुन देण्याचा महायज्ञ अखंड चालु आहे, यामुळे अनेक मुल मुली आपल्या कुटूंबाचा आधार बनुन आई वडीलांनी डोळ्यात साठविलेले स्वप्न पुर्ण करीत आहेत. काही विध्यार्थी परदेशातील नामांकित विध्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळवुन एमएस करण्यासाठी जात आहेत तर काही दोन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी जात आहे.
संजीवनी शैक्षणिक संकुलाला ४० वर्षांची प्रदिर्घ परंपरा असुन ४० वर्षांपूर्वी संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यावेळी पाहिलेली दुरदृष्टीता सत्यात उतरत असल्याने ही सर्व उपलब्धी खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरत आहे. संजीवनीचे अनेक माजी विध्यार्थी देश परदेशात कार्यरत असुन तेही संजीवनी मधिल सध्याच्या गोरगरीब विध्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देवुन असे विध्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातुन बाहेर पडणार नाही याची काळजी घेतात, ही बाब सुध्दा संजीवनीच्या माजी विद्यार्थ्यांचे उत्तरदायित्वाचे प्रतिक आहे. संजीवनीचे व्यवस्थापन आणि सर्व कर्मचारी आपल्या विध्यार्थ्यांना कशी मदत करता येईल, याचा सातत्याने विचार करीत असतात, मात्र विध्यार्थीही तितकाच होतकरू व पात्र असावा, हे महत्वाचे आहे, असे श्री कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थी, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, कार्पोरेट हेड (इंडस्ट्री रिलेशन्स) श्री इम्राण शेख, स्थानिक समिती सदस्य डाॅ. डी. बी. क्षिरसागर, डाॅ. माधुरी जावळे, डाॅ. संदिप सोणवने व प्रा. शिवाजी पवार यांचे अभिनंदन केले. श्री अमित कोल्हे यांनी सर्व शिष्यवृत्तीधारक विध्यार्थ्यांचा सत्कार केला.
फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सायबेग कंपनीकडून रू ९. ५ लाखांची शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.