कोपरगाव (दि. २५ मे २३) – कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एस.एस. जी. एम. महाविद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या उतुंग यशाच्या निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. महाविद्यालयाचा या वर्षाचा बारावी विज्ञान वर्गाचा निकाल ९८.९५ %, वाणिज्य विभागाचा निकाल८८.१४%, कला विभागाचा निकाल ५५.४५% व एच एस व्ही सी विभागाचा निकाल ८४.२१% इतका लागला.
बारावी विज्ञान वर्गात ८३.३३ % गुण मिळवून शेलार अर्चित संतोष प्रथम तसेच जाधव ओमकार सतीश ७९.५०%, कु. आत्तार मशिरा जुबेर ७८.६७% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले
बारावी वाणिज्य वर्गात लोळगे अंजली सतीश ८४.३३ %, सोमासे मयूर वेनुनाथ ८२.३३% टक्के व गाढे उमाकांत शांताराम ७९.५०% गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
बारावी कला वर्गात कु. खटकाळे पूजा रवींद्र ९०.८३% कु. पठारे संजना प्रकाश ८५.५०% व कु. खटकाळे कल्याणी आप्पासाहेब ८१.६७ % गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
बारावी एच एस व्ही सी वर्गात बुटेकर ओम यशवंत ६०.८३%, आहेर अभय राजू ५४.५०%, सोळसे विवेक बाळासाहेब ५२.५०% गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे साहेब, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य मा. डॉ. आर आर सानप साहेब, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री. आर एम गमे सर, कार्यालय अधीक्षक श्री. सुनिल गोसावी सर, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी अभिनंदन केले आहे.