कोपरगाव : कोपरगावच्या साईप्रसाद राजेंद्र सालकर याने जर्मनीच्या स्टुटगार्ट विद्यापीठाकडून इन्फोटेक (एम्बेडेड सिस्टम्स) एम एस: मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग पदवी प्राप्त केली आहे
स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी येथे त्याचे संशोधन प्रबंध (Research Project) सादर केले होते. त्यात स्टुटगार्ट, जर्मनी या विद्यापीठाची एम एस: मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंग ही पदवी मिळून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
साई प्रसाद सालकर यांनी शारदा इंग्लिश स्कूल मधून दहावी पास केल्यानंतर संजीवनी येथील के बी पी पॉलिटेक्निक मध्ये इ एन टी सी या शाखेतून डिप्लोमा केला चांगले मार्क मिळवून पुणे येथील पी आय सी टी कॉलेजमध्ये डिग्री साठी प्रवेश मिळवला त्या कॉलेजमध्ये पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळून एनटीसी शाखेची डिग्री प्राप्त केली त्यानंतर अमेरिका किंवा जर्मनीमध्ये जाऊन इ एन टी सी मध्ये एम एस करण्याची त्याचे स्वप्न होते त्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटीकडे प्रयत्न केले परंतु आधी त्याला टीसीएस पुणे या कंपनीत त्याला नोकरी मिळाली पुन्हा येथे एक दीड दोन वर्षे काम केल्यानंतर कंपनीने त्याला जपान येथे पाठवले तेथे दीड वर्ष सर्विस करीत असताना प्रमोशन झाले चांगला पगार मिळू लागला परंतु एम एस करण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहते की काय याची सल मात्र त्याच्या मनात काय होती याच काळात जर्मनी येथील स्टुटगार्ट युनिव्हर्सिटी मध्ये त्याचा नंबर लागला त्याला आनंद झाला मोठ्या धाडसाने त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून एम एस साठी जर्मनीमध्ये प्रवेश घेतला शिक्षणाचा लाखो रुपयांच्या खर्च भागविण्यासाठी त्यांनी शिकण्याबरोबरच पार्ट टाइम नोकरी सुद्धा केली व मोठ्या चिकाटीने अभ्यास करून त्याने एम एस पूर्ण करून स्वप्न साकार केले.
एम एस चे स्वप्न पूर्ण करीत असतानाच जर्मन मधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत तो नोकरी करीत आहे. जर्मनी येथे स्टुटगार्ट युनिव्हर्सिटी मध्ये पदवीदान समारंभ शुक्रवारी रात्री झाला जर्मनी मधील फाइव स्टार हॉटेलमधील भव्य दिव्य समारंभात पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळवून इन्फोटेक स्टडीजचे डीन आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आणि इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशनचे प्रमुख, स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी अर्ड वॉर्डे: प्राध्यापक. डॉ.-आयएनजी स्टीफन टेन ब्रिंक यांचे हस्ते एम एस: मास्टर ऑफ सायन्स इन इंजीनियरिंगही पदवी स्विकारली. सालकर कुटुंबातील परदेशात उच्च पदवी घेणारा तो पहिला ठरला याचा मला निश्चितच अभिमान आहे.
जर्मनी सारख्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित स्टुटगार्ट विद्यापीठाची एम एस पदवी मला मिळाली हे मी माझे स्वतःचे व आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आज पदवी स्वीकारताना खूप आनंद वाटतोय अशी प्रतिक्रिया साईप्रसाद सालकर यांने दिली आहे.