कोपरगांवःसंजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकडमीच्या इ.१० वी व इ. १२ वीच्या वर्गांचा सीबीएसईचा निकाल आज जाहिर झाला असुन यात इ.१० वीच्या अनुश्री योगेश बनकर ने ९८. २० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. तर इ.१२ वी (कॉमर्स) वर्गात पुर्वा सचिन कोठारी हिने शेकडा ९४. १४ गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाली.तर इ. १२ वी शास्त्र विभागात हर्षवर्धन नानासाहेब पंडीत याने ८२. २० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाला. इ. १० वी व १२ वीच्या दोनही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला असुन उत्कृष्ट निकालाची परंपरा संजीवनी अकॅडमीने राखली आहे, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात डॉ. कोल्हे पुढे म्हणाल्या की सीबीएसई (केंद्रिय माध्यमिक शिक्षण बोर्ड) ने इ. १० वी इ. १२ वीच्या फेब्रुवारी/मार्च २०२३ मध्ये परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षांचा निकाल आज जाहिर झाला. यात संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यानी दैदिप्यमान कामगिरी करून आपल्या प्रतिभा संसन्नतेचे दर्शन घडवुन संजीवनी अकॅडमीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असल्याची पावती दिली.
यात इ. १० वी मध्ये हितेन समिर षाह याने ९७. ६० टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर मनस्वी विजय नरोडे हिने ९७ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. इ.१० वी मध्ये ११ विध्यार्थ्यांनी ९० टक्यापेक्षा अधिक गुण मिळवुन बाजी मारली. इ. १२ वी कॉमर्स मध्ये तनिषा सचिन लुटे हिने ८८ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला. इ. १२ वी शास्त्र विभागाच्या विध्यार्थ्यांची एनईईटी व जेईई या पुढील प्रवेश परीक्षांची तयारीही करून घेण्यात आली होती.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांचे पालक यांचे तसेच प्राचार्या शैला झुंजारराव यांचे अभिनंदन केले आहे.