संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची रू ५ व रू ५. ५ लाख वार्षिक पॅकेजवर नोकऱ्यांसाठी निवड संजीवनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिक गतिमान यश
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलिकडेच चार नामांकित कंपन्यानी घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम सत्रातील ११ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली असुन त्यापैकी चार विध्यार्थ्यांना प्रत्येकी रू ५ लाख व सात विध्यार्थ्यांना रू ५ . ५ लाख वार्षिक पॅकेजचे नेमणुक पत्र दिले आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या नवोदित अभियंत्यांना एका पाठोपाठ एक कंपनी प्रथम पसंती देत असुन संजीवनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे यश अधिक गतिमना होत असल्याचे संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की शेतात काय पिकते, त्यापेक्षा कोणते पीक अधिक चांगल्या भावाने विकल्या जाते, अशा पिकांची लागवड करावी, असा तज्ञांचा सल्ला असतो. तद्वतच आपल्या अभियंत्यांना कोणते आधुनिक तंत्रज्ञान दिले म्हणजे त्यांना नोकरीसाठी कंपन्या प्रथम पसंती देवुन चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील, या मुद्याचा विचार करून संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे कंपन्यांना अभिप्रेत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात केलेला असल्यामुळे विध्यार्थ्यांना पगाराचे चांगले पॅकेज मिळत आहे.
अलिकडेच फोरसिया टेक सेंटर या कंपनीने धनश्री भाऊसाहेब काळे, सिमरन साबिर सय्यद, आकांक्षा मच्छिंद्र कोळपे यांची वार्षिक पॅकेज रू ५ . ५ लाखांवर निवड केली आहे. जॉनसन कंट्रोल्स प्रा. लि. या कंपनीने साक्षी संजय भडकवाडे, सोनिया अनिल पवार, कुणाल शर्मा व जगदिश शरद शिंदे यांची रू ५ . ५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे. फ्युजनस्टॅक टेक्नॉलॉजीज कंपनीने अजय समाधान बोर्डे याची वार्षिक पॅकेज रू ५ लाखांवर निवड केली आहे. जेएनके इंडिया प्रा. लि. कंपनीने ऋतुजा संजय शिंदे, श्रीकांत अरूण जेजुरकर व देवाशिष मनोहर पाठक यांची रू ५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विध्यार्थी व त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके यांचे अभिनंदन केले आहे.
विध्यार्थीनींच्या प्रतिक्रिया
‘माझी निवड फोरसिया कंपनीमध्ये झाली असुन ही कंपनी मला व्हेईकल डीझाईन विभागात आर अँड डी चे काम आहे. मला कॉलेजमध्ये सॉलिडवर्कस्, कटिया अशा सॉफ्टवेअर्स सखोल ज्ञान मिळाले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटने मॉक मुलाखती घेतल्या आणि माझी निवड झाली. माझे वडील शेतकरी असुन त्यांची मी स्वतःच्या पायावर उभी रहावी अशी इच्छा होती. माझ्या कुटूंबात मागील पिढ्यांचा विचार केला तर मुलगी म्हणुन मी प्रथमच नोकरी करणार आहे, हे सर्व संजीवनीमुळे शक्य झाले.’-आकांक्षा कोळपे
‘माझी जॉनसन कंट्रोल्स या ऑटोमेशन कंपनीमध्ये निवड झाली आहे. माझ्या ब्रॅन्चचे कोर नॉलेज आणि कॉलेजने माझ्याकडून नाशिकच्या एक ऑटोमेशन कंपनीमध्ये पुर्ण करून घेतलेली इंटर्नशिपचा माझ्या निवडीसाठी खुप उपयोग झाला. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटने राबविलेले विविध उपक्रम या सर्व बाबींमुळे माझी सहज निवड झाली’-सोनिया पवार