कोपरगाव – पुणतांबा येथे गेल्या बारा महिन्यापासून सुरू असलेल्या हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामार्फत मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर शिवसेना नेते अनिलराव नळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना विभाग प्रमुख आबासाहेब नळे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
आज २४ व्या टप्प्या अंतर्गत आजपर्यंत २८२ नेत्र रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या व २१०० रुग्णांना डोळ्यासंदर्भातील आजारावर मोफत औषध उपचार करण्यात आले. १३० रुग्णांना दूरदृष्टीचे चष्मे वाटण्यात आले.
महिन्यातून दोनदा पुणतांबा येथे शिबिर असते कोपरगाव राहता तालुक्यातील आसपासच्या गाव खेड्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
शिवसैनिक व चांगदेव नगर युवा मंचचे कार्य ज्येष्ठ नागरिकांकरिता वरदान ठरत आहे. यावेळी आयोजक आबासाहेब नळे यांनी सांगितले की अविरतपणे सेवा करून आजपर्यंत २८२ नेत्र रुग्णांवर यशस्वीपणे मोतीबिंदू काचबिंदू व तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया पुणतांबा पंचक्रोशीतील माता भगिनींच्या विना मोबदला करण्यात आल्या .
शिवसेनेचे विभाग प्रमुख आयोजक आबासाहेब रवी पाटील यांनी सांगितले २१०० रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून मोफत औषधोपचार करण्यात आले. शिवसेनेचे चांगदेव नगर युवा मंचचे कार्यकर्ते मनापासून मेहनत करतात .
यावेळी शिवसेनेचे अशोकराव गायकवाड, तोफिक भाई तांबोळी, चांगदेव नगर युवा मंचचे पंकज नळे, दादाभाऊ आगरे, संजय धनवटे, शौकत भाई शहा, दत्ता धनवटे, शिवा भाऊ प्रधान, विकास जोगदंड, विकास गायकवाड, किशोर जमधडे,दत्ता शेठ परदेशी हे शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेत आहेत.
शेवटी आभार तोफिक तांबोळी यांनी मानले.