कोपरगाव – पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणारे खंदकनाल्यावरील अतिक्रमण गेल्या काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले व सदर नाल्याची खोलीकरण व रुंदीकरनाचे काम नगरपालिकेने हाती घेतले होते मात्र सदर काम अर्थवट अवस्थेत असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करत लागत असल्याचे चित्र असून सदर ठिकाणी अपघात होऊन दुर्घटना घडू शकते. सदर खंदकनाला सुस्थितीत करून वाहतूकदारांना, नागरिकांना दिलासा दयावा तसेच नगरपालिका हद्दीतील खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसविण्याची मागणी नगरपालिकेकडे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
सदर पत्रकात मंगेश पाटील म्हणाले आहे की, खंदक नाल्या शेजारून जाणाऱ्या रोडा जवळ भाजीपाला मार्केट असून सदर ठिकाणी रोज अंधारात पहाटे ५ वाजता भाजीपाला लिलावा साठी शेतकरी , व्यापारी आपला माल छोट्या मालवाहतूक रिक्षा , टेम्पो , मोटरसायकल यातून घेऊन येत असतात. सदर नाल्याच्या अर्थवट कामामुळे रिक्षा , टेम्पो , मोटरसायकल नाल्यात पलटी होऊन
अपघात घडून जीवित हानी होण्याची शक्यता असल्याचे मत मंगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले आहे की, काही महिन्यांपूर्वी खंदकनाल्यामुळे काही भागात पावसाचे पाणी घरात घुसुन पुर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गोरगरीबांचे कुटुंबांची नुकसान होऊन आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशी परिस्थिती परत येऊ नये म्हणुन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने खंदकनाला रूंद व खोल करण्यात आला मात्र त्याचे खोदकामात आज हि अपुर्ण आहे .
सदर नाल्यातील दोन पाईप काढले गेले नसून आणि खोदकाम झाल्यावर त्या खोदकामाची काही माती त्या नाल्या शेजारी टाकण्यात आली आता ती माती वाळुन परत नाल्यात जात आहे आणि नाल्याची किनार हि भुईसपाट होत आहे. हा नाला उघडा असल्याने व्यापारी, दुकानदार व नागरिकाना दुर्गंधी, डास याचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर नाल्याचे काम व्यवस्थित होणे गरजेचे आहे.
सदर हा नाला (नगरपालिका हद्दीतुन जिथुन सुरू झाला तिथुन खोल करत त्यास संरक्षण कठडे बसवावे अशी मागणी मंगेश पाटील यांनी नगरपालिकेकडे केली आहे
यापुढे मंगेश पाटील म्हणाले आहे की, आजच खंदकनाल्याची परिस्थिती दयनीय झाली असुन नाल्याचे रूप पाहता जनतेच्या आरोग्याशी खेळणारी गटार झाली आहे. यामुळे शहराच्या वैभवाला कलंक ठरत आहे.
याकडे संबंधित प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन वरील संबंधित सुधारणा या नाल्याची करावी अशी जनतेची हि मागणी आहे . तसेच प्रशासनाने आता अपघात होण्याची वाट न पाहता सर्वात अगोदर त्वरीत लक्ष देऊन खंदकनाला शहरासाठी जो अविशाप ठरत आहे त्याचे काम त्वरीत मार्गी लावण्याची मागणी केली आहे.