कोपरगाव – ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आयुर्वेदाची माहिती देऊन त्या उपचार पद्धतीतून विविध आजारावर मात करणे कसे शक्य आहे याबाबतचे प्रबोधन व्हावे यासाठी भोजडे येथे संबंधित तज्ञ यांचे मार्फत आयुर्वेद शिबिर आयोजित करण्यात आले त्याचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला अशी माहिती मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक धट यांनी दिली.
जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सुरळकर यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजून सांगितली. प्रारंभी सरपंच माननीय सुधीर वादे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रदीप मोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद महापदी यांच्या सूचनेनुसार मराठा क्रांती संघटना आयोजित मोफत आरोग्य शिबिर सर्वत्र घेतले जात आहे.
सदरचे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी कोपरगाव तालुका संघटक राजेंद्र ठोंबरे, उत्तम धट, सचिव सोमनाथ राशिनकर, तसेच वसंत दादा मल्टीस्टेटचे अध्यक्ष मुकुंद सिनगर आदींनी विशेष परिश्रम घेतले.