ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक
कोपरगाव : संदीप कोयटे यांचा जगभरातील पतसंस्था चळवळीकडून झालेला गौरव हा केवळ समता पतसंस्थेचा गौरव नाही तर कोपरगाव शहराला भूषण आहे.तसेच महाराष्ट्रातील पतसंस्था व बँकिंग चळवळीला अभिमानास्पद आहे.त्यांनी केलेले प्रतिनिधित्व हे समता पतसंस्थेचे नव्हे तर भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.असे गौरवोद्गार कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री राजेश ठोळे यांनी काढले.
समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे हे नुकतेच स्कॉटलंड येथे १७ ते २० जुलै २०२२ दरम्यान ६७ देशातील पतसंस्थांच्या प्रतिनधींच्या उपस्थित झालेल्या जागतिक सहकार परिषदेत समता पतसंस्थेच्यावतीने भारत देशाचे प्रतिनिधित्व करून कोपरगावला परतले त्या निमित्ताने त्यांचा सत्कार समता परिवाराच्या वतीन करण्यात आला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव येथील जेष्ठ अर्थतज्ञ श्री अशोक अजमेरे हे होते. त्याप्रसंगी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक श्री राजेश ठोळे बोलत होते.
सत्कार समारंभा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे म्हणाले की, जगभरात पतसंस्था चळवळ आहे. पतसंस्था चळवळ परदेशात क्रेडिट युनियन या नावाने ओळखली जाते. वर्ल्ड ऑर्गनायझेशन को-ऑप क्रेडिट युनियन ही संस्था परदेशात कार्यरत आहे.या जागतिक संघटनेकडून मला ग्लासगो (स्कॉटलंड) या ठिकाणी समता पतसंस्थेच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? याविषयी समता पतसंस्था व भारत देशाचे प्रतिनिधत्व करत सादरीकरणाची संधी मिळाली.सहकारात पतसंस्थांचे कामकाज करत असताना महाराष्ट्रातील पतसंस्था या समता पतसंस्थेचे आदर्श कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारत देशात सर्वात प्रथम क्यू.आर.कोड सुविधा समता पतसंस्थेने सभासदांना उपलब्ध करून दिली हे ऐकून उपस्थित जगभरातील प्रतिनिधींनी आश्चर्य व आनंद व्यक्त केले.विशेषतः क्यू.आर कोडचा वापर जगभरात फारसा होत नाही,जगभरात क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे.परंतु भारतात समता पतसंस्थेने १५ हजाराच्या वर दुकानांमध्ये क्यू.आर.कोड बसवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे.याबद्दल जगभरातील पतसंस्था चळवळीकडून अभिनंदन होत आहे.परंतु परदेशातील बँकिंग चळवळीमध्ये सुरू असलेली निओ बँकिंग संकल्पना ही भारतात अद्याप आलेली नाही.पण निओ बँकिंग च्या माध्यमातून भारतात ब्रंच लेस बँकिंग ही संकल्पना मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते. त्यामुळे भारतातील सहकार चळवळीतील पतसंस्थांनी केवळ शाखा उभारणीवर अधिक भर न देता ब्रांच लेस बँकिंग संकल्पनेचा अभ्यास करून ती अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.असे आवाहन श्री संदीप कोयटे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अर्थतज्ञ श्री अशोक अजमेरे म्हणाले की,समता पतसंस्थेने सोनेतारण कर्ज वाटपात केलेल्या उच्चांकाबद्दल आनंद व समाधान वाटत आहे. समता पतसंस्थेने सोने तारणात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून खाजगी कंपन्यांना ही लाजवेल अशा प्रकारचे काम करत असल्यामुळे समताच्या ठेवी अधिकाधिक सुरक्षित झाले आहे.समता पतसंस्थेच्या प्रत्येक सेवकांमध्ये बदल स्वीकारणे ही वृत्ती असल्याने आज समता प्रगतीकडे वाटचाल करत आहे.तसेच समताच्या प्रत्येक सेवकाने ज्ञानाने अधिक परिपक्व होत संदीप कोयटे यांच्या तरुण नेतृत्वाखाली संस्थेची अधिक प्रगती करावी.
प्रसंगी कोपरगाव शहरातील पटेल ऑप्टिकल चे मालक श्री अनुप पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही बदलत्या काळानुसार गरजेची बाब आहे, पण या अत्याधुनिक तंत्रज्ञानात फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक जपून केला पाहिजे.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक श्री राजेश ठोळे, प्रसिध्द जेष्ठ अर्थ तज्ञ श्री अशोक अजमेरे, समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,ज्येष्ठ संचालक श्री रामचंद्र बागरेचा,श्री चांगदेव शिरोडे,श्री जितुभाई शहा,श्री गुलशन होडे,संचालिका सौ शोभा अशोक दरक, प्रसिद्ध व्यापारी श्री अशोक दरक,श्री दिपक अग्रवाल,श्री किरण शिरोडे, श्री अनुप पटेल तसेच समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी मानले. उपस्थितांचे आभार ठेव विभाग प्रमुख श्री संजय पारखे यांनी मानले.